Top 5 Best English Speaking Apps in 2020 / इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत

आपल्याला इंग्रजी शिकायचंय पण कुठे आणि कशी सुरुवात करायची हे जर माहिती नसेल तर आपलं हे आर्टिकल “Top 5 English speaking apps in 2020” तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे, तसेच ह्या आर्टिकल मध्ये आम्ही ५ अँप्लिकेशन्स बद्दल माहिती देणार आहोत आणि सोबतच आर्टिकल च्या अखेरीस तुमच्यासाठी एक बोनस टीप सुद्धा आहे. चला तर मग सुरु करूया इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत..

इंग्रजी ही तशी कठीण भाषा नाही पण मूळ भाषिकांना देखील शुद्धलेखन, व्याकरण आणि योग्य विरामचिन्हे वापरण्यात त्रास होतो. तथापि, काही चिकाटी व सरावानंतर हे शक्य आहे. सध्याच्या काळात तुम्हाला इंग्रजी ऑनलाईन शिकण्यासाठी खूप पर्याय आहेत, त्यात Youtube, Udemy, Coursera आणि Android Apps सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स चा समावेश आहे. आजच्या आर्टिकल मध्ये आपण ह्या पर्यायानंपैकी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी उपयुक्त असलेले व्हॉईस रेकॉग्निशन, इंग्रजी बोलणारे अ‍ॅप्स, इंग्रजीचे धडे अ‍ॅप्स आणि भाषेचे शिक्षण देणारे अ‍ॅप्स यांचा समावेश आहे. खाली दिलेल्या यादीमध्ये क्रं.१ किंवा क्रं.५ हे त्यांच्या गुणवत्तेनुसार नाही आहे, ह्यात फक्त आम्हाला वाटणाऱ्या टॉप ५ अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Top 5 Best English Speaking Apps in 2020 / इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत

. हॅलो इंग्लिश / Hello English

Hello English हे इंग्रजीसाठी सर्वात लोकप्रिय भाषा शिकणार्‍या अ‍ॅपपैकी एक आहे. यात शेकडो धडे, खेळ आणि शिकण्यासाठीची इतर सामग्री देण्यात आली आहे. अ‍ॅपमध्ये 10,000 शब्दांचा शब्दकोष आहे , शिक्षकांसह one-on-one सत्राचा पर्याय, जागतिक लीडरबोर्ड आणि ऑफलाइन समर्थन देखील समाविष्ट आहे. अ‍ॅपमधील बरीचशी सामग्री धड्यांसह, गेम्स इ. सह विनामूल्य आहे. तथापि, काही वैशिष्ट्ये ज्यात शिक्षक one-on-one सत्रासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. कधीकधी ह्या साठी खूप पैसे मोजावे लागतात. हा अ‍ॅप इंग्लिश शिक्षण मजेदार बनवतो. Best English Speaking Apps पैकि एक आहे.

Hello English App

Google Play Store वर १ करोड पेक्षा जास्त लोकांनी “Hello English” ला वापरलं आहे आणि ४.६ ची रेटिंग दिली आहे.

Rating: 4.5 out of 5.

Spoken english app, english conversation app, english speaking apps, spoken english to marathi

फायदा / Pros:

 • तुम्ही इंग्लिश वेगवेगळ्या अश्या २२ भाषांमधून शिकू शकता. (उदा. मराठी ते इंग्लिश, हिंदी ते इंग्लिश)
 • सुरुवातीला ३ level दिल्या जातात त्यातून आपण आपल्या ज्ञाना नुसार (Beginner, Intermediate आणि Professional) निवडू शकता.
 • १०००० शब्दा पेक्षा जास्त शब्द शब्दकोश मध्ये आहेत, जे तुमचं इंग्लिश vocabulary वाढविण्यास मदत करतात.
 • तुम्ही खेळ खेळता सुध्दा इंग्रजी शब्द शिकू शकता, तुम्ही दुसऱ्या युसर्स सोबत स्पर्धा खेळून कॉईन्स जिंकू शकता.
 • Chat Helpline च्या सहाय्याने तुम्ही दुसऱ्या लोकांशी इंग्रजी मध्ये बोलून आपल्या शंका दूर करू शकता.
 • तुम्ही धडा शिकल्यानंतर तुम्हाला गृहपाठ दिला जातो, गृहपाठ केल्याने तुम्ही धड्यामध्ये शिकलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला मदत होते.

तोटा / Cons:

 • काही गोष्टी ह्या मर्यादित आहेत, त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला Pro Version विकत घ्यावं लागत.
 • Live Class किंवा शिक्षकांशी बोलण्यासाठी पैसे मोजावे लागतात.

२. इंग्लिश ग्रामर टेस्ट / English Grammer Test

English Grammar Test लोकप्रिय इंग्रजी अ‍ॅप्सपैकी एक आहे. यात व्याकरणासाठी 1,200 हून अधिक Task आहेत. हे काळ, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, पूर्वसूचना, शब्द क्रम आणि अशा इतर गोष्टी शिकण्यास मदत करते. (Tenses, Pronouns, Adjectives, Adverbs, Prepositions, Word order). ह्या अ‍ॅप्स मध्ये आपण सराव परीक्षा, चाचणी, मटेरियल डिसाईन आणि आपण केलेल्या कोर्सच विश्लेषण ह्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्याकरण शिकण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

english speaking apps

Google Play Store वर ५० लाख पेक्षा जास्त लोकांनी “English Grammar Test” ला वापरलं आहे आणि ४.6 ची रेटिंग दिली आहे.

Rating: 4.5 out of 5.

Spoken english app, english conversation app, english speaking apps

फायदा / Pros:

 • English Grammar Test तुमच्या कढून कोणताही शुल्क आकारात नाही, हा पूर्ण पणे मोफत आहे.
 • तुम्हाला १२०० पेक्षा अधिक टास्कच्या मार्फत शिकायची संधी मिळते.
 • तुम्ही तुमच्या गरजेनूसार वेगवेगळ्या Topics शिकू शकता.
 • Chat Room च्या सहाय्याने तुम्ही दुसऱ्या लोकांशी इंग्रजी मध्ये बोलून आपला आत्मविश्वास वाढवू शकता.

तोटा / Cons:

 • आपण अ‍ॅप् वापरत असताना जाहिराती दाखवल्या जातात.
 • व्हिडिओ कॉल सारखा पर्याय नाही, ज्याने आपण समोरच्याशी इंग्लिश मध्ये बोलून आपला आत्मविश्वास वाढवू शकतो.
 • आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कोणत्याही शिक्षकांची सोय नाही.

. ड्युओलिंगो / Duolingo

ड्युओलिंगो इंग्रजीसह दोन डझनपेक्षा जास्त भाषांना शिकण्याची सूट देतो आणि तेही मोफत. Duolingo इंग्रजी शिकवण्यासाठी एक मजेदार पद्धत वापरतात. आपण व्याकरण आणि शब्दसंग्रहातील काही धडे खेळ म्हणून खेळताना समजून घेऊ शकतो, Duolingo वापरकर्त्यांना लहान लहान गेमद्वारे प्रेरित करते. अशा प्रकारे, मॉन्डली, मेमरीझ आणि इतर सारख्या अधिक गंभीर अ‍ॅप्सपेक्षा हे थोडे अधिक रंगीबेरंगी आणि मजेदार आहे. Best English Speaking Apps पैकि एक आहे.

Top 5 Best English Speaking Apps in 2020 / इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत

Google Play Store वर ९० लाख पेक्षा जास्त लोकांनी “Duolingo” ला वापरलं आहे आणि ४.७ ची रेटिंग दिली आहे.

Rating: 4.5 out of 5.

Spoken english app, english conversation app, english speaking apps

ड्युओलिंगो सर्वात आधी तुमची इंग्रजी भाषेबद्दल असलेल्या माहितीची पूर्व परीक्षा घेतो ज्यामुळे तुम्हाला जर आधी पासून भाषेचं थोडं ज्ञान असेल तर ते परीक्षेत समजून येत आणि तुम्हाला येत नसलेल्या किंवा तुम्हाला अडचण येत असलेल्या भागात तुम्हाला शिकण्यास मदत करतो. आम्ही निश्चितपणे इंग्रजी शिक्षण अ‍ॅप्सपैकी हे एक आहे जे आम्ही लोकांना वापरण्याची शिफारस करतो.

फायदा / Pros:

 • कोणतीही भाषा शिका तेही अगदी मोफत.
 • तुम्ही इंग्रजी मध्ये उच्चरलेले वाक्य समजण्यासाठी AI (Artificial Intelligence) चा वापर करतात.
 • तुमच्या प्रगतीचा आणि शिकलेल्या गोष्टींचा ग्राफिक्स च्या स्वरूपात एक देखावा देतात.
 • तुम्हाला अगदी सुरुवातीपासून इंग्लिश शिकण्याची गरज नाही, तुमची परीक्षेच्या मार्क्स नुसार तुमचा कोर्स अ‍ॅप्स ठरवतो.

तोटा / Cons:

 • तुमची चुकी झाल्यास दंड दिला जातो, ड्युओलिंगो मध्ये चुकीला माफी नाही.
 • पुढील अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक धडा पूर्ण करणे गरजेचे आहे, त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही.
 • व्हिडिओ शिकवणी किंवा इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी काही पर्याय नाही.

. इंग्लिश लिस्टनिंग अँड स्पिकिंग / English Listening and Speaking

English Listening and Speaking हे आणखी एक सभ्य इंग्रजी अ‍ॅप आहे. ह्यात बर्‍याच उतारा, रेकॉर्डिंग्ज, मुहावरे, वाक्ये आणि शब्दसंग्रह असलेले इंग्रजी बोलणारे अ‍ॅप आहे. हे मेमराइज किंवा ड्युओलिंगो सारख्या अ‍ॅप्ससारखे संरचित नाही. तथापि, हे दुय्यम सरावासाठी उत्कृष्ट काम करते. अ‍ॅपमध्ये मिनी-गेम्स, ऑफलाइन समर्थन, बुकमार्क करणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. इंग्रजी आणि मूळ भाषिकांसाठी हे आणखी एक आहे. अ‍ॅप-मधील खरेदीशिवाय हे पूर्णपणे विनामूल्य आहे. Best English Speaking Apps पैकि एक आहे.

English Listening and Speaking mobile app

Google Play Store वर १० लाख पेक्षा जास्त लोकांनी “English Listening and Speaking” ला वापरलं आहे आणि ४.5 ची रेटिंग दिली आहे.

Rating: 4.5 out of 5.

Spoken english app, english conversation app, english speaking apps

फायदा / Pros:

 • हा अ‍ॅपमध्ये तुम्ही संभाषणाचा सराव करू शकता.
 • Voice Recognition च्या साहायाने तुमचा आवाज त्यात रेकॉर्ड केला जातो आणि संभाषण पूर्ण केले जाते.
 • english pronunciation म्हणजेच इंग्रजी शब्दाचं उच्चरण सुधारायला मदत होते.
 • तुम्ही संभाषणात दिलेल्या वाक्याला पहिले ऐकून नंतर स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून तपासू शकता.

तोटा / Cons:

 • अ‍ॅप जरी मोफत असला, तरी प्रत्येक संभाषणाचे वाक्य म्हणजेच सामग्री हे इंटरनेट वरून download करावी लागते.
 • कधी कधी voice recognition भारतीय उच्चरण (Indian Accent) ओळखत नाही, त्यामुळे आपल्याला बोलायचं वाक्य समजत नाही.
 • व्हिडिओ शिकवणी किंवा इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी काही पर्याय नाही.

. ग्रामरली कीबोर्ड / Grammarly Keyboard

Grammarly Keyboard हे आणखी एक सभ्य इंग्रजी अ‍ॅप आहे जे लिखाणासाठी खूप उपयुक्त आहे, Grammarly तुमच्या लिखाणातल्या चुका त्वरित सुधारते. हे केवळ चुकाच तपासत नाही तर आपल्या चुकीचे स्पष्टीकरण देखील देते जेणेकरून आपण पुन्हा तीच चूक पुन्हा पुन्हा करणार नाही. आपल्या फोनवर वापरण्यासाठी कीबोर्ड डाउनलोड करा आणि आपण जेथे जेथे जाल तेथे शब्दलेखन तपासा. Grammarly फक्त मोबाईल साठी नसून कॉम्पुटर साठी सुद्धा आहे, कॉम्पुटर वर अ‍ॅप आणि chrome वर extension सुद्धा वापरू शकतो.

Top 5 Best English Speaking Apps in 2020 / इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत

Google Play Store वर १ लाख पेक्षा जास्त लोकांनी “Grammarly Keyboard ” ला वापरलं आहे आणि ४.२ ची रेटिंग दिली आहे.

Rating: 4 out of 5.

Spoken english app, english conversation app, english speaking apps, spoken english

फायदा / Pros:

 • हा अ‍ॅप लिखाणासाठी खूप चांगला आहे, ह्याचा वापर करून आपण आपल्या लिखाणातल्या चुका आपण त्वरित सुधारू शकतो.
 • Mobile वर कीबोर्ड डाउनलोड करून आपण कुठल्याही प्लॅटफॉर्म वर इंग्लिश मध्ये लिहू शकता आणि आपल्या व्याकरणातल्या चुका सुधारू शकता.
 • ह्या मध्ये Word Choice च्या पर्यायाचा वापर करून तुम्ही लिहलेल्या शब्दासाठी चांगला पर्यायी शब्द तुम्हाला सांगतो.
 • हा अ‍ॅप लेखक किंवा कॉन्टेन्ट writer साठी खूपच उपयुक्त आहे कारण ह्यामध्ये Auto Correct चा option सुद्धा आहे.

तोटा / Cons:

 • अ‍ॅप जरी मोफत असला, तरी अतिरिक्त मदती साठी आपल्याला ह्याच pro version डाउनलोड करावं लागत.

आणखी वाचा:

बोनस टिप्स / Bonus Tips:

 • रोज इंग्रजी वर्तमान पत्र वाचा
 • इंग्लिश गाणी ऎका
 • इंग्लिश चित्रपट किंवा Web Series बघा ज्याने इंग्रजी शब्द आणि वाक्य सतत तुमच्या कानावर पडत राहतील
 • आपल्या मित्रांशी किंवा ऑफिसच्या मित्रांशी ३-४ वाक्य का होईना रोज बोलण्याचा प्रयत्न करा.
 • Youtube किंवा Udemy सारख्या प्लॅटफॉर्म्स वर मोफत English Speaking Courses आहेत ते बघत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *