Easy Mahajob Portal Registration 2020 महाजॉब्स पोर्टल वर आजच अर्ज करा.

महाजॉब्स / Mahajob

कोविड-१९ मुळे जागतिक पातळीवर केवळ आरोग्य संकटच नव्हे तर आर्थिक संकट म्हणून सुद्धा ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि उपाययोजनांमुळे महाराष्ट्रावर आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५% वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणार्‍या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्तिथीत महाराष्ट्र बाहेरील कामगारांनी आपआपल्या गावी गेल्यामुळे उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा जॉब्स’ पोर्टलचं आज लोकार्पण केलं.

Mahajobs Portal Login 2020

उद्देश / Mahajobs Motto

हा पोर्टल सुरु करण्याचा उद्देश असा आहे कि महाराष्ट्रातील उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्या. कंपन्यांना किती आणि कोणत्या शिक्षण असलेले कामगार किंवा कर्मचारी हवे आहेत तर त्याची माहिती त्यांना पोर्टल वर मिळणार आहे तसेच भूमिपुत्रांना पारदर्शक पणे नौकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा ह्या पोर्टल चालू करण्याचा उद्देश आहे. उत्तम मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक प्रगती करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे. नोकरी शोधणा-या भूमिपुत्र कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा Mahajob Portal चा प्रयत्न आहे.

पर्याय / Mahajobs Options

तुम्हाला ह्या पोर्टल वर आपला खात उघडायच्या आधी तुम्हाला कोणत्या दोन पर्यायांपैकी पर्याय निवडायचा आहे ते ठरवावं लागेल. इथे जे कामगार किंवा कर्मचारी म्हणून लॉगिन करायचं असेल तर तुम्हाला नोकरी शोधक नोंदणी पर्यायावर जाऊन आपल्या फॉर्म भरावा लागेल आणि जर तुम्ही उद्योजक आहात किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला उद्योजक नोंदणी या पर्यायावर जाऊन आपला फॉर्म भरावा लागेल. पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहे कि Mahajob Portal Login कसं करू शकता.

नोंदणी / Login Mahajobs 2020

1. नोकरी शोधक नोंदणी / Jobseeker Registration

नोकरी शोधक नोंदणी हा पर्याय त्यांच्यासाठी आहे जे नोकरी शोधात आहेत. ह्या मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे आणि जर कुठल्या उद्योजकाला तुमच्या Profile शी निगडित काही असेल तर ते तुमच्याशी संवाद साधणार.

Jobseeker Registration 2020 Mahajobs

A. पूर्ण नाव / Full Name * – इथे तुम्हाला तुमचा पूर्ण नाव टाकायचं आहे.

B. आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे का? | Do you have Domicile certificate of Maharashtra? – इथे तुम्हाला हो किंवा नाही अश्या पर्यायानं पैकी एक पर्याय निवडायचा आहे. (लक्षात घ्या तुम्हाला ह्या पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.)

C. भ्रमणध्वनी क्रमांक | Mobile No. – तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकल्या नंतर तुम्हाला ओटीपी मिळवा या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल वर ६ आकडी ओटीपी येईल तो तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक ओटीपी | Mobile No. OTP ह्या रकान्या मध्ये भरायचा आहे. भरल्यानंतर ओटीपी पडताळणी करा ह्या बटण वर क्लिक करून तुमचा ओटीपी पडताळून घ्या.

D. ई – मेल आयडी | Email id. – तुमचा ई – मेल आयडी टाकल्या नंतर तुम्हाला ओटीपी मिळवा या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या ई – मेल आयडी वर ६ आकडी ओटीपी येईल तो तुम्हाला ई – मेल आयडी ओटीपी | Email OTP ह्या रकान्या मध्ये भरायचा आहे. भरल्यानंतर ओटीपी पडताळणी करा ह्या बटण वर क्लिक करून तुमचा ओटीपी पडताळून घ्या. (पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी यूजर आयडी म्हणूनही वापरता येतो.)

E. नवीन पासवर्ड | New password – इथे तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड बनवायचा आहे. नवीन पासवर्ड बनवण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. नवीन पासवर्ड लांबी किमान 8 वर्ण आणि कमाल 20 वर्ण असाव्यात. पासवर्डमध्ये किमान 1 अप्परकेस वर्णमाला, 1 लोअरकेस वर्णमाला, 1 संख्या आणि 1 विशेष वर्ण असणे आवश्यक आहे.

F. पासवर्डची पुष्टी करा | Confirm password – तुमची जो नवीन पासवर्ड बनवला आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकावयाचा आहे.

G. Captcha – बाजूला दिलेल्या चौकोनात माहितीला तुम्हाला तासाच्या तसं रिकाम्या रकान्यात भरायचा आहे.

वरील दिलेली सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा / Submit या बटण वर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

आणखी बरंच काही –

५ ऑनलाईन व्यवसाय कल्पना मराठी मध्ये | 5 online business ideas in Marathi

शॉप १०१ वर पुनर्विक्री करा आणि कमवा महिना रु. १५००० ते रु. २००००

1 of 2 Next

View Comments (0)