Motivational Quotes And Status In Marathi: या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी 250+Motivational Quotes And Status In Marathi घेऊन आलो आहोत। आयुष्यात आपल्यातील प्रत्येकाने कोणत्या न कोणत्या संकटाला मात दिली आहे . संकट हे छोटे असो वा मोठे त्याला सामोरे जाण्यासाठी हिंमत मात्र मोलाची लगते। अशा संकटांमध्ये तुमची हिंमत वाढवण्यासाठी हे Motivational Quotes And Status In Marathi हे खुप महत्वपूर्ण भूमिका बजावतील हीच आशा।
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
जोपर्यंत जीवन आहे,
तोपर्यंत शिका.
कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल
तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही
पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
नक्कीच आयुष्य बदलू शकतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट
हटके मार्गाने करा.
स्वतःचा विकास करा.
लक्षात ठेवा की,
गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या
तरच यश मिळालं असं समजा.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतः वर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात
ज्यांचे निर्धार ठाम असतात,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
तुमचं यश यावरून ठरवा की,
तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे.
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे,
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन !
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय
तर अपमान गिळायला शिका.
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं
स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील.
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो
तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे.
ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त
कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा
दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो
अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा
यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही
यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा
करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.
यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे,
उत्साह कमी न करता.
जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात
तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल,
पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल.
ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही
आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही
याला आयुष्य असं म्हणतात.
मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही,
मी त्यासाठी काम केलं.
जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल.
आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.
जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.
यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे
आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत.
जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल
तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.
गरज संपली की विसरणारे फार असतात,
गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.
सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं.
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.
आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते
ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू.
जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत,
ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही
लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे,
चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे
तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे.
भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही
जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे
या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग
म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना
देतो त्यावर काम करणं
कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा
भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी
आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या
विचारांनी जगता आलं पाहिजे.
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता.
जुन्यात आपण रंगतो.स्मृतीची पानं उलटायला
बोटांना डोळयातलं पाणी लागते.
मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!
जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की,
आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.
एक उंच शिखर सर केल्यावर
तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर
करण्यासाठी खुणावलं पाहिजे.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
सगळं नीट होईल कदाचित आज नाही,
पण येत्या काळात.
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही.
म्हणून प्रयत्न करत राहा.
“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”
हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही.
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.
सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं.
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.
मी हे ओळखलं आहे की,
कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं
यात साहस नसून आपल्या भीतीवर
विजय मिळवणं हे साहसी आहे.
न हरता, न थकता न थांबता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.
कधी कधी चांगले घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.
“तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.”
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
मागे आपला विषय निघाला की समजायचे
आपण पुढे चाललो आहोत.
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
हिंमत एव्हढी ठेवा की,
तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल.
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे,
मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.
जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत,
कोणाला दाखवताही येत नाहीत पण सतत ठसठसत राहतात.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ.
चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे
यावर यश अवलंबून असते.
तुम्ही जितकं कठीण काम कराल
तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.
अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत,
तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”
आधी विचार करा; मग कृती करा.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण हजारो चुका माफ करणारे
आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत.
मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं,
सत्यात नाही.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की
जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की
सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात,
काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.
कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते महत्वाचं आहे.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही
तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता, फळं वाहता,
न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता
पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली,
की मात्र शंका उपस्थित करता की
हे काम मला जमेल की नाही.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
माणसाला स्वत:चा “photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.
कारण हा निसर्गाचा नियमच आहे.
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची,
जिथे हरण्याची भीती वाटते.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
चांगली माणसे आणि चांगली पुस्तके
लगेच लक्षात येत नाहीत.
त्यांना वाचावं लागतं.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही.
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचंही तसंच आहे.
काही काळासाठीच दुःख राहतं,
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात,
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
यश ही तुमची सावली आहे
तिला पकडायचा प्रयत्न करू नका.
तुमचा मार्ग चालत राहा,
ते आपोआप तुमच्यामागे येईल.
लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते
जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही
महान कार्य करणं शक्य नाही.
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
लोक तुमची स्तुती करोत वा निंदा,
तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो,
तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या,
आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.
लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे.
माणसाच्या आयुष्यातील संकटं ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.
आयुष्यात समस्या असतील तरच
तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.
यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.
खरं तर सगळे कागद सारखेच.
त्याला अहंकार चिकटला की,
त्याचे सर्टिफिकेट होते.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.
सकारात्मक विचार केला की
नकारात्मक काही उरत नाही.
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतः ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून
प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.
यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.
यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग
हा अगदी एकसारखाच आहे.
यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.
कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की,
ते काम आवडीने करा.
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो,
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
जिथे चूक नसेल तिथे माफी मागू नका आणि
जिथे तुमचा आदर केला जात नाही,
तिथे कधी पाय ठेवू नका.
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.
बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की
त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं.
पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं
सदैव तुमच्या हातात आहे.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा
कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो.
न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर
नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं.
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.
रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते…
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
तिचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती तुम्हाला
उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
लोकं नावं ठेवतच राहणार,
पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.
जगाच्या रंगमंचावर असे वावरा की
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही
हे नेहमी लक्षात ठेवा.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते,
तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी
तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
स्वतःचं मन शांत करता आलं की
सगळे गोंधळ आपोआप शांत होतात.
भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात
आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
कार्य हाच यशाचा पाया आहे.
आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील,
तेव्हा समजून जा,
तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहात.
कारण जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात,
तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही
तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये.
तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल
तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्वकाही सांगेल.
विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
भलेही यशाची खात्री नसेल
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी.
नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते,
मेहनत करूनच उघडावे लागते.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
[250+] Motivational Quotes in Marathi | चांगले व प्रेरणादायी विचार मराठी
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका.
कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे
त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.
अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
भावूक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी हिम्मत हारु नका..”
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत,
ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
साधी माणसं नेहमी फसवली जातात
कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात.
आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही पण
जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हा.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.
मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील.
काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात
तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो,
पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभं असतं.
त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर
अजिबात वाईट वाटून घेऊ नका,
कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो.
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही
तर यशही हाताळता येणार नाही.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात,
ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या कमतरता न दिसता
आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतील.
एक वेळी एकच काम करा
आणि ते काम करताना
त्यात आपला पूर्ण आत्माही घाला
आणि बाकी सगळं विसरून जा.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
आपला वेळ मर्यादित आहे,
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात
वाया घालवू नका.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा
आत्मविश्वास
जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
आयुष्य फार सुंदर आहे
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे.
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
नजरेत भरणारी सर्वच असतात पण
तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
Read More
- 8 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 7 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 6 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 5 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
- 4 ऑक्टोबर आजचा दिनविशेष 2024 | जागतिक दिन – घटना -जन्म – मृत्यू
8 thoughts on “250+Motivational Quotes And Status In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी”