mahatma jyotiba phule speech in marathi : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषण घेऊन आलेलो आहोत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान हे खूप मोठे असते जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये योग्य तो मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे आणि एक चांगले जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु आज आपण या लेखामध्ये अशा महान समाज सुधारक आणि विचारवंत ज्योतिराव फुले निमित्त भाषण मराठीमध्ये बघणार आहोत
महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू-भगिनींनो.. मी आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या…
अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या,
अशा हरिजन – गिरीजन, अडलेल्या – नडलेल्या
आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या..
दिनदलितां चा ज्या महान पुरुषाने उद्धार केला
असे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले !
स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतित करणारे वंचितांचे उद्धारकर्ते… स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मठ विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. असे स्त्री शिक्षणाचे जनक… महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला. गोरे हे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांनी फुले या नावाने ओळखू लागले.
महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा…सामाजिक क्रांतिकारक असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा…घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा… सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले…
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले..
ज्योतिबा हे शूद्र-अतिशूद्रांच्या गुलामगिरीचे – दुःखाचे कारण
अविद्या – अज्ञान आहे असे म्हणत.
जैसे बोलने बोलावे, तैसे चालणे चालावे,
मग महंत लीला, स्वभावाचे अंगी बाने.
या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन त्यांनी दिले. रात्र शाळेची सुरुवात करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशी असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाजसुधारणेचा झेंडा सर्वदूर फडकवला.
आपल्या कार्यामुळे “महात्मा” बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना व असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम आणि जाता जाता एवढेच म्हणेन…
” आधुनिक भारताचे शिल्पकार…
दीनदुबळ्यांचा बनले आधार…
यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले…
तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले…”
Related Content :
- जातीचे प्रमाणपत्र कसे काढावे ? how to apply caste certificate
- 200+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | Mhani in Marathi
- 250+Motivational Quotes And Status In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
- 500+ Motivational Quotes in Marathi |प्रेरणादायी विचार मराठी
- 50+Ganpati Visarjan Quotes | गणपती विसर्जन कोट्स
- 1000+ सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी 2024 | GK Questions and Answers in Marathi