200+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ | Mhani in Marathi

मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ : नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या की वारंवार परीक्षेत आलेल्या 200+ महत्त्वाचे म्हणी पाहणार आहे की ज्या म्हनी प्रत्येक परीक्षेसाठी या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहेत आणि तुम्हाला जर याची पीडीएफ marathi mhani pdf लागत असेल तर याची आर्टिकल मध्ये लिंक दिलेली आहे.

म्हणी म्हणजे काय

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List: मराठी व्याकरण मध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या ५०० हुन अधिक मराठी म्हणी संग्रह व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ.


मराठी जुन्या म्हणी, आधुनिक म्हणी, गावरान, मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार, मराठी विनोदी म्हणी, ऐतिहासिक म्हणी, मराठी म्हणींचा संग्रह व त्याचे अर्थ, वाक्यात उपयोग स्पष्टीकरणासह खाली दिलेल्या आहेत. सर्वप्रथम आपण म्हणी म्हणजे काय बघूया.

Mhani in Marathi:

म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमा ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात.
नक्की वाचा –

म्हणी वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उदाहरण:

  • मराठी म्हणी ओळखा
  • म्हण पूर्ण करा.
  • म्हणीचा अर्थ सांगा.
  • वाक्यात उपयोग करा.

सहसा विचारल्या जाणाऱ्या 100+मराठी म्हणीचा संग्रह दिला आहे अर्थांसोबत मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List :

अनु. क्रम्हणीअर्थ
1उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूकएखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
2उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगअतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
3उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरीअति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
4उथळ पाण्याला खळखळाट फारअंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
5उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरीजेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
6उधारीची पोते, सव्वा हात रितेउधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
7उभारले राजवाडे तेथे आले मनकवडेश्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.
8उभ्याने यावे आणि ओणव्याने जावेयेते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.
9उसाच्या पोटी कापूससद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.
10ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणेअतिशय हलाखीची स्थिती.
11ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नयेकोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
12एक कोल्हा सतरा ठिकाणी व्यालाएका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
13एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
14एका कानावर पगडी, घरी बाईल उघडीबाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
15एका खांबावर द्वारकाएकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
16एका पिसाने मोर होत नाहीथोड्याश्या यशाने हुरळून जाणे
17एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीतदोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
18एका माळेचे मणीसगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
19एका हाताने टाळी वाजत नाहीदोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
20एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडीदुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
अनु. क्रम्हणीअर्थ
1एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नयेदुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
2एकावे जनाचे करावे मनाचेलोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
3ऐंशी तेथे पंचाऐंशीअतिशय उधळेपणाची कृती.
4ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
5ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
6ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटोकोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
7ओळखीचा चोर जीवे न सोडलीओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
8औटघटकेचे राज्यअल्पकाळ टिकणारी गोष्ट.
9कणगीत दाणा तर भिल उताणागरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
10कधी तुपाशी तर कधी उपाशीसांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.
11कर नाही त्याला डर कशाला ?ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?
12करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापतेकाही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.
13करावे तसे भरावेजशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
14करीन ते पूर्वमी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
15करुन करुन भागला, देवध्यानी लागलाभरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
16कशात-काय-अन-फाटक्यात-पायवाईटात आणखी वाईट घडणे
17का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढनिरर्थक गोष्टींची काळजी करणे.
18कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावातचुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
19काकडीची चोरी फाशीची शिक्षाअपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
20काखेत कळसा गावाला वळसाजवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे
21काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवतीगोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.
अनु. क्रम्हणीअर्थ
1आपलेच दात आपलेच ओठआपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
2आपल्याच पोळीवर तूप ओढणेफक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
3आयजीच्या जीवावर बायजी उदारदुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
4आयत्या बिळावर नागोबाएखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
5आलिया भोगासी असावे सादरतक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
6आवळा देऊन कोहळा काढणेआपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
7इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
8इच्छा परा ते येई घराआपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
9इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होतेइच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
10इन मीन साडेतीनएखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
11ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतोजन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
12उंदराला मांजर साक्षज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.
13उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठीप्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
14उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आलेफायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.
15उकराल माती तर पिकतील मोतीमशागत केल्यास चांगले पीक येते.
16उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
17उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
18उचलली जीभ लावली टाळ्यालादुष्परिणामाचा विचार न करता बोलणे
19उठता लाथ बसता बुक्कीप्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.
20उडत्या पाखराची पिसे मोजणेअगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
अनु. क्रम्हणीअर्थ
1काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीरक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.
2काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीजे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
3काडीचोर तो माडीचोरएखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.
4काना मागुन आली आणि तिखट झालीश्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
5कानात बुगडी, गावात फुगडीआपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
6काप गेले नी भोके राहिलीवैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या
7कामापुरता मामाआपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
8काल महिला आणि आज पितर झालाअतिशय उतावळेपणाची वृत्ती.
9काळ आला; पण वेळ आली नव्हतीनाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
10कावळा बसला आणि फांदी तुटलीपरस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे
11कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीशूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.
12कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसतेपूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
13कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचादुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
14कुडी तशी फोडीदेहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
15कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडेमूळचा स्वभाव बदलत नाही.
16कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळस्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
17केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेएखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
18केळीला नारळी अन घर चंद्रमौळीअत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
19केस उपटल्याने का मढे हलके होते ?जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.
20कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणीमहान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.
अनु. क्रम्हणीअर्थ
1कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशीचूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
2कोल्हा काकडीला राजीलहान लहान गोष्टींनी खुश होतात.
3कोळसा उगाळावा तितका काळाचवाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
4खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखतेखर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
5खऱ्याला मरण नाहीखरे कधीच लपत नाही.
6खाई त्याला खवखवेजो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
7खाऊ जाणे तो पचवू जाणेएखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो.
8खाऊन माजावे टाकून माजू नयेपैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
9खान तशी मातीआई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
10खायला काळ भुईला भारनिरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
11खोट्याच्या कपाळी गोटाखोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
12ग ची बाधा झालीगर्व चढणे
13गरज सरो, वैद्य मरोएखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.
14गरजवंताला अक्कल नसतेगरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.
15गरजेल तो पडेल कायकेवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही.
16गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
17गळ्यात पडले झुंड हसून केले गोडगळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.
18गळ्यातले तुटले ओटीत पडलेनुकसान होता होता टळणे.
19गाड्याबरोबर नळ्याची यात्रामोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
20गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळमूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.
अनु. क्रम्हणीअर्थ
1गाढवाच्या पाठीवर गोणीएखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.
2गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होतामुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो.
3गाढवाला गुळाची चव काय ?ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
4गाय व्याली, शिंगी झालीअघटित घटना घडणे.
5गाव करी ते राव न करीश्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.
6गोगलगाय न पोटात पायबाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.
7घडाई परिस मडाई जास्तमुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.
8घर ना दार देवळी बिर्हाडशिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती.
9घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतातएखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.
10घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडेअडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे
11घरोघरी मातीच्या चुलीएखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
12घेता दिवाळी देता शिमगाघ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.
13घोडे कमावते आणि गाढव खातेएकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.
14चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळमुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
15चार जणांची आई बाजेवर जीव जाईजबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.
16चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
17चालत्या गाडीला खीळव्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
18चिंता परा येई घरादुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते.
19चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतलास्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
20चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाईघरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.
अनु. क्रम्हणीअर्थ
1चोर सोडून संन्याशालाच फाशीखर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
2चोरांच्या हातची लंगोटीज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.
3चोराची पावली चोराला ठाऊकवाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
4चोराच्या उलट्या बोंबास्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
5चोराच्या मनात चांदणेवाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.
6चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
7जलात राहून माशाशी वैर करू नयेज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
8जळतं घर भाड्याने कोण घेणार ?नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?
9जळे आणि हनुमान बेंबी चोळेदुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे
10जशी देणावळ तशी धुणावळमिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
11जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाहीबाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
12जारात तुरी भट भटणीला मारीकाल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे
13जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेदुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.
14जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवलेजितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे.
15जे न देखे रवि ते देखे कवीजे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
16जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशीअतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे.
17जो गुळाने मरतो त्याला विष कशास ?जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.
18ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळीएकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
19ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळीजो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.
20ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरेएखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
अनु. क्रम्हणीअर्थ
1ज्याच्या हाती ससा, तो पारधीज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
2झाकली मूठ सव्वा लाखाचीव्यंग नेहमी झाकून ठेवावे.
3टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाहीकष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.
4डोळ्यात केर आणि कानात फुंकररोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.
5ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागलावाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.
6ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसावाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
7तट्टाला टूमणी, तेजीला इशारतजी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
8तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसेअगदी उलट गुणधर्म दिसणे.
9तळे राखील तो पाणी चाखीलज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.
10ताकापुरते रामायणएखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
11तितका संतापकामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे
12तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाहीचणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
13तीन दगडात त्रिभुवन आठवतेसंसार केल्यावरच खरे मर्म कळते.
14तुकारामबुवांची मेखन सुटणारी गोष्ट
15तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचेआपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.
16तेरड्याचा रंग तीन दिवसकोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.
17तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आलेमूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
18तोंड दाबून बुक्क्यांचा मारएखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.
19तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागेखायला पुढे कामाला मागे.
20थेंबे थेंबे तळे साचेदिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
अनु. क्रम्हणीअर्थ
1थोरा घराचे श्वान सर्व ही देती मानमोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.
2दगडापेक्षा वीट मऊमोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.
3दस की लकडी एक्का बोजाप्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.
4दहा गेले, पाच उरलेआयुष्य कमी उरणे.
5दाखविलं सोनं हसे मुल तान्हंपैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
6दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीतएक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.
7दात कोरून पोट भरत नाहीमोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
8दाम करी काम, बिवी करी सलामपैसे खर्च केले की कोणतेही काम होते.
9दिल चंगा तो कथौटी में गंगाआपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.
10दिल्ली तो बहुत दूर हैझालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
11दिवस बुडाला मजूर उडालारोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.
12दिव्याखाली अंधारमोठ्या माणसातदेखील दोष असतो.
13दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागतेएखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
14दुभत्या गाईच्या लाथा गोडज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
15दुरून डोंगर साजरेकोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
16दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाहीदुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.
17दृष्टीआड सृष्टीआपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
18देखल्या देवा दंडवतसहज दिसले म्हणून चौकशी करणे.
19देणे कुसळांचे घेणे मुसळाचेपैसे कमी आणि काम जास्त.
20देव तारी त्याला कोण मारी ?देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
अनु. क्रम्हणीअर्थ
1देवा दंडवतएखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.
2देश तसा वेशपरिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.
3दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायलानशिबाने मिळणे परंतु घेता न येणे
4दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाईनशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
5दैव देते आणि कर्म नेतेनशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.
6दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठीनशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.
7दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशीदोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.
8धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशीकोणत्याच कामाचे नसणे.
9धर्म करता कर्म उभे राहतेएखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
10धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळाछोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.
11धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्यागुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.
12न कर्त्याचा वार शनिवारएखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.
13नऊ दिवसकोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
14नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नेदोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात
15नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नयेनदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
16नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारेकेलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.
17नाक दाबले, की तोंड उघडतेएखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
18नाकापेक्षा मोती जडमालकापेक्षा नोकर शिरजोर असणे
19नाकापेक्षा मोती जडमालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे
20नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेलाआधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.

मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ Mhani in Marathi PDF

नक्की वाचा –

Spread the love