Marathi shuddh lekhan | मराठी शुद्धलेखनाचे नियम

Marathi shuddh lekhan :या पोस्टमध्ये आपण मराठी शुद्धलेखनाचे नियम – Marathi Shudhlekhnache Niyam पाहणार आहोत. मराठी भाषेत लिहिताना शुद्धलेखनाचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम, आपण शुद्धलेखन म्हणजे काय हे पाहूया.

शुद्धलेखन म्हणजे शब्दांचे योग्य आणि नियमबद्ध लेखन करणे. मराठी भाषेतील प्रत्येक अक्षर, स्वर, व्यंजन, आणि जोडाक्षरांचे योग्य प्रकारे लेखन करणे हे शुद्धलेखनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. योग्य शुद्धलेखन केल्याने वाचकाला शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो आणि भाषेचे सौंदर्य टिकून राहते.

मराठी शुद्धलेखनाचे नियम (Marathi Shudhlekhnache Niyam)

मराठी शुद्धलेखनाचे खलील चार महत्वाचे नियम आहेत.

  • अनुस्वार
  • रहस्व – दीर्घ अक्षरे
  • सामान्यरूप
  • इतर

चला तर मग आपण प्रत्येक नियम उदाहरणसमवेत जाणून घेऊयात .

अनुस्वार:

मराठी शुद्धलेखनाच्या नियमानुसार अनुस्वार नाकातून उच्चारित होणाऱ्या ध्वनींना दर्शवण्यासाठी वापरला जातो. मराठी मध्ये अनुस्वार “ं” अशाप्रकारे दर्शवला जातो.

मराठी शुद्धलेकनानाच्या नियमानुसार खालील दिलेल्या वेळी अनुस्वार वापरला जातो.

. नाकपासून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.

            उदा. डोंगर, सतरंजी , धंदा , कुंभार , अंधार , पंचमी इ.

२. नामांच्या व् सरनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.

 उदा. लोकांना, मुलांकडून , मित्रांचे , घोड्यांसाठी , त्यांना इ .

३. आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा .

 उदा. शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी , विवेकनंदांनी , राणडेंनी इ .

४. पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

जसे – का, की , केळे ,करू , करताना , खेळू , घरात , घरी , जाऊ , तेथे , तेव्हा , जेथे , जेव्हा , झोप , नव ,नवे , पाच , बसु , माती , लाकूड , शाळेत ,. (कारण – या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)

मराठी शुद्धलेखनाचे नियम

रहस्व आणि दीर्घ अक्षरे :

मराठी भाषेतील स्वरांच्या उच्चारावर आधारित हे दोन प्रकार पाडले जातात.

१. रहस्व अक्षरे:

रहस्व म्हणजे लहान किंवा संक्षिप्त उच्चार केली जाणारी स्वराक्षरे. ही अक्षरे तात्काळ उच्चारली जातात आणि त्यांचा उच्चार लवकर संपतो. उदा:

उदा: अ, इ, उ, ऋ

उदाहरणे:

  • अन्न
  • उद्या
  • ऋषी
२. दीर्घ अक्षरे:

दीर्घ म्हणजे लांब किंवा दीर्घकालीन केली जाणारी स्वराक्षरे. या अक्षरांचा उच्चार थोडा वेळ धरून ठेवला जातो, त्यामुळे ते दीर्घ उच्चारित होतात.

उदा: आ, ई, ऊ, ए, ओ, औ

उदाहरणे:

  • आम्र
  • ऊन
  • ओळख

मराठी शुद्धलेकनानुसार रहस्व आणि दीर्घ अक्षरे वापरण्यासाठी खालील नियम वापरले जातात.

  1. इ – कारान्त आणि ‘उ’ – कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे ,

 उदा – मी , कवी , गुरु , बाहु , जू , ऋषी , गती , वही ,गहू , पेरू , वाळू , शत्रू.

 परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार रहस्व होतात.

 उदा . विद्यार्थिभांडार ऋषिकुमार , कविचरित्र , लघुकथा, शत्रुपक्ष इ.

 अपवाद – अति , आणि , नि , परंतु , तथापि , अद्यापि , यद्यपि , प्रभुति , यथामति , यथाशक्ति , इति , ही अव्वये रहस्वातच लिहावी.

  •  सामासिक शब्दातील पहिले पद रहस्व ‘ ‘ कारान्त किंवा ‘ ‘ कारान्त असल्यास ते रहस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ ‘‘ कारान्त किंवा ‘‘ कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते .

उदा . कविचरित्र , गतिमान , गुरुवर्य , पशुपक्षी , युक्तिवाद , लघुकथा , वायुपुत्र , शक्तिमान , हरिमन , गोरीह्रम्ब्दूवर इ .

  •  अका्रान्त शब्दातील उपान्त्य ‘ ‘ कार किंवा ‘ ‘ कार दीर्घ असतो.

 उदा . ऊस , गुळ , चूल , नीळ , दूध , धीट , धुप , नीट , नवीन ,पाऊस , पूल , फूल , बहीण , माणूस , मीठ , मूल इ.

 अपवाद – संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना है नियम लागू नाही.

उदा . अरुण , कुसुम , गुण , तरुण , दक्षिण , पश्चिम , प्रिय , मधुर , मंदिर , युग , विष , शिव , इ.

४ . एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत – उदा . मी , तू , ही , जी , ऊ , थू , धू , पी , पू , शी इ.

 ५ . शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा रहस्व असते.

 उदा . दिवा ,जुनी , किती , मुळा , महिना , वकीली , गरीबी , गुरूजी , माहिती , सुरु , हुतुतू इ.

 अपवाद – संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना है नियम लागू नाही.

 उदा – परीक्षा ,प्रतीक्षा , गीता , पूजा इ.

 ६ . शब्दाच्या शेवटी ‘इक ‘ प्रत्यय आल्यास ‘‘ पूर्वीचा ‘‘ कार ‘‘ कार रहस्व लिहावा.

उदा – ऐतिहासिक, कौटुंबिक , धनिक , लौकिक , वार्षिक , शारीरिक , सार्वजनिक , साप्ताहिक , नैतिक , पुराणिक , बौद्धिक , भाविक , मानसिक इ.

७ . हळूहळू , लुटुलुटू , दूडूदूडू, मुळूमुळू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते.

८ . गावाच्या नावात शेवटी ‘ पूर ‘ ही अक्षरे असल्यास त्यातील ‘ पू ‘ नेहमी दीर्घ लिहावे.

 उदा . नागपूर , बिजापूर इ.

सामान्यरूप :

१ . रहस्व ‘इ कारन्त व ‘उ ‘ कारान्त तत्स्म शब्दाचे सामान्यरूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो .

उदा – रवि -रवीचे , प्रभु – प्रभूला इ.

 २ . मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ ) ई किंवा ऊ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्यरूप होताना ते उपान्त्य अक्षर रहस्व होते .

 उदा. – वीट – विटेने , मूठ ,- मुठीत , बहिण – बहिणीला , रायपुर – रायपुरात इ.

अपवाद – संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना है नियम लागू नाही.

उदा. – सीता -सीतेला , पूर्व -पूर्वेकडे ,परीक्षा -परीक्षेसाठी , पूजा -पूजेकरिता इ.

4. इतर:                              

१ . कोणता , एखादा हे शब्द कोणचा व एकादा असे लिहू नये.

२ . ‘ ‘ कारान्त नामाचे सामान्यरूप ‘ या ‘ कारान्त करावे .

 उदा – फडके – फडक्यांना , रस्ते -रस्त्यांना , हसणे – हसण्यासाठी , आंबा – आंब्यांना , लिहणे – लिहिण्यासाठी.

३ . धातुला ‘ऊन ‘ व् ‘‘ प्रत्यय लागताना मूळ धातूत शेवटी ‘‘ असल्यास त्यावेळी ‘वून व् वू ‘ किंवा ‘ ऊन ‘, ‘‘ अशी रुपे होतात.

उदा – धव – धावून , जेव – जेवून , जेवू जा – जाऊन , जाऊ.

४ . राहणे, पाहणे, वाहणे हे शब्द असेच लिहावेत .या शब्दांची रहाणे, पहाणे , वहाणे , ही चुकीची रुपे असल्याने ही लिहू नयेत .

५ . मराठीत रूढ झालेले तत्सम व्यंजनांत शब्द ‘ अ ‘ कारान्त लिहावेत .त्यातील शेवटच्या अशरचा (संस्कृतातल्याप्रमाणे )पाय मोडू नये.उदा . अर्थात , साक्षात, कदाचित , भगवान , तस्मात इ.

६ . लिहिताना एखाद्या माणसाच्या तोंडचे शब्द त्याच्या मूळ उच्चारा प्रमाणे जसेच्या तसे लिहावेत .

उदा . ” मला असं वाटतं की मिलापचं चित्र बरोबर असावं. “

काही शुद्ध शब्द

अधिक , अधीन , अधीर , अनिल , इच्छा , इयत्ता , ईर्षा , ईश, ईश्वर , उद्योग , उज्ज्वल , उष्ण , उत्कृष्ट , उर्फ , एखादा , एकूण , कर्तत्व , कीर्ती.

 क्रीडा , खड्ग , गृहस्थ , जीवन , ज्येष्ठ , द्वितीया , तृतीया.

निः स्पृह , परामर्ष , पृष्ठ , पृथ्वी , बृहस्पती , मातुः श्री , महत्व.

लक्ष्मण , वक्तृत्व , वृक्ष , सत्त्व , क्षत्रिय.

स्वाध्यायपुढील अशुध्द शब्द शुद्ध करुन लिहा – आकर्शण , उंदिर , खुण , हिन , चिरंजिव , दिव्याकार , दिपक , फुल , भिक , विहिर .

Related Content :

Spread the love

1 thought on “Marathi shuddh lekhan | मराठी शुद्धलेखनाचे नियम”

Leave a Reply