शब्दांच्या जाती – shabdanchya jati in marathi – मराठी व्याकरण

shabdanchya jati in marathi : या पोस्टमध्ये आपण शब्दांच्या जाती – shabdanchya jati in marathi पाहणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परिक्षेमध्ये shabdanchya jati in marathi बद्दल एक ना दोन प्रश्न हमखास विचारले जातात.

मराठी व्याकरणात शब्दांचे प्रकार वाक्यातील भूमिकेनुसार ठरवले जातात. शब्दांच्या मुख्यतः २ प्रकार पडले जातात.

shabdanchya jati in marathi – शब्दांच्या जातीचे चे २ प्रकार :

·       विकारी शब्द ·     अविकारी शब्द

चला तर आपण या दोन शब्दांच्या जाती व् त्यामध्ये मोडल्या जाणऱ्या अन्य ८ शब्दांच्या जातींबददल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

1)    विकारी शब्द:

ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या रुपात बदल केला जातो अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात. यांनाच सव्यय असेही म्हणले जाते.

उदा . मनुष्य , ती , हसला इ.

2)    अविकारी शब्द:

ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या रुपात कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही, अशा शब्दांना विकारी शब्द म्हणतात. यांनाच अव्यय असेही म्हणले जाते.

उदा . हळू ,तर ,परंतु इ.

शब्दांच्या एकूण ८ जाती आहेत.

१.) नाम 

२.) सर्वनाम

३.) विशेषण

४.) क्रियापद

५.) क्रियाविशेषण

६.) शब्दयोगी अव्यय

७.) उभयान्वयी अव्यय

८.) केवलप्रयोगी अव्यय

शब्दांच्या या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार जाती विकारी शब्दांच्या प्रकारात मोडतात. म्हणजेच या चार जातींतील शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल केला जातो.

क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या चार जाती अविकारी शब्दांच्या प्रकारात मोडतात. म्हणजेच या चार जातींतील शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे कोणताही बदल केला जात नाही.

shabdanchya jati in marathi – शब्दांच्या जातीचे चे ८ जातींबद्द्ल माहिती खालीलप्रमाणे आहे .

1. नाम:

नाम हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या वस्तूच्या, स्थळाच्या, प्राण्याच्या किंवा काल्पनिक गोष्टीला दर्शवल्या जाणाऱ्या नावाला नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात. अधिक माहिती.

उदा: मुलगा, झाड, पुस्तक, पुणे, आनंद इत्यादी.

2. सर्वनाम:

कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामचे मुख्य ६ प्रकार पडतात. अधिक माहिती.

उदा: तो, ती, ते, आपण, मी इत्यादी.

3. विशेषण:

जे शब्द नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्द्ल अधिक माहिती जसे गुणवत्ता, रंग, संख्या, किंवा आकार सांगतात अशा शब्दांना विशेषण ऐसे म्हणतात. विशेषणचे मुख्य ४ प्रकार पडतात. अधिक माहिती.

उदा: चांगला, लहान, मोठा, सुंदर, पाच इत्यादी.

4. क्रियापद:

असे शब्द ज्यांच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा असे शब्द जे किर्या किंवा कृती दर्शवतात त्यांना क्रियापद ऐसे म्हणतात.

क्रियापदचे मुख्य ६ प्रकार पडतात. अधिक माहिती.

उदा: कर, चाल, खेळ, लिहा, बोल इत्यादी.

५. क्रियाविशेषण:

क्रियाविशेषण म्हणजे असे शब्द जे क्रियापदांबद्द्ल अधिक माहिती देतात.

क्रियाविशेषण चे मुख्य ४ प्रकार पडतात. अधिक माहिती.

उदा: लवकर, हळू, नीट, जोरात इत्यादी.

५. शब्दयोगी अव्यय :

नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणारे शब्द किंवा असे शब्द जे नामांचा व् सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा: झाडावर, तिच्यासाठी, कारण इत्यादि.

.) उभयान्वयी अव्यय :

दोन शब्द किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य जोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा: व, किंवा , म्हणुन , आणि, परंतु इत्यादी

.) केवलप्रयोगी अव्यय :

एखादी वृती किंवा भावना व्यक्त करन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा: वाहवा , बापरे , शाब्बास, अरेरे इत्यादी.

Related Content :


Spread the love

Leave a Comment